औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रम आणि स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन

Thu 09-Oct-2025,02:06 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP)’ व स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), आरमोरी येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचा प्रारंभ माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन, पूजन व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. 

कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभासी माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार (सर्व उपस्थिती आभासी), तसेच कार्यक्रमाला मुख्य अतिथी हितेश दहिकर (विश्वकर्मा लाभार्थी), तहसीलदार सौ.उषा चौधरी आणि पोलीस निरीक्षक कैलास गवते यांचा समावेश होता.

या उपक्रमांतर्गत उद्योग-संरेखित व कौशल्य आधारित अल्पकालीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आता थेट उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण मिळणार अंतर्य, नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माजी आमदार कृष्णा गजबे यांनी ‘तंत्रज्ञानाशी जुळलेले कौशल्य विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील रोजगारक्षम बनवेल. शासनाच्या पुढाकारामुळे गडचिरोली जिल्ह्याचा वेगाने विकास होईल,’ असे आवर्जून सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थी, पदाधिकारी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.